रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व
रत्नागिरी, दि. 24 - रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा अंतिम निकाल जाहीर झाला असून शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. दोन पंचायत समित्या मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरे स्थान मिळवले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यातल्या नऊपैकी पाच पंचायत समित्यांवर शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 55 जागांपैकी शिवसेनेला 39 जागा मिळाल्या. गेल्यावेळेपेक्षा सेनेच्या दोन जागा वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 15, तर काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. गेल्या वेळी 8 सदस्य असलेल्या भाजपचा एकही उमेदवार यावेळी निवडून येऊ शकला नाही. नऊ पंचायत समित्यांच्या 110 जागांसाठीही निवडणूक झाली होती. त्यापैकी सर्वाधिक 73 जागा शिवसेनेला, तर त्याखालोखाल 31 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. रत्नागिरी, लांजा, राजापूर, खेड, आणि संगमेश्वर या पाच पंचायत समित्यांवर शिवसेनेने सत्ता प्रस्थापित केली आहे. गुहागर आणि दापोली पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे. मंडणगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी दोन, तर चिपळूणमध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी समसमान नऊ जागा मिळाल्या आहेत. पंचायत समित्यांमध्ये भाजपला 4, तर मनसे आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. एकाही अपक्षाला जिल्हा परिषदेत किंवा पंचायत समितीमध्ये मतदारांनी कौल दिला नाही.
जिल्ह्यात नऊ पंचायत समित्यांच्या 110 जागा आणि जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी गेल्या 21 फेब्रुवारीला निवडणूक झाली. सरासरी 64 टक्के मतदान झाले. आज सकाळी प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणी निवडणुकीची मतमोजणी झाली. दुपारी बारा वाजल्यापासून निकाल यायला सुरवात झाली. प्रमुख विजेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव गुहागर तालुक्यातल्या अंजनवेल गटातून विजयी झाले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष बने यांचे पुत्र रोहन बने संगमेश्वर तालुक्यातल्या कोसुंब गटातून निवडून आले. त्यांनी भाजपचे प्रमोद अधटराव यांचा अवघ्या 150 मतांनी पराभव केला. माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने यांना तिसर्या क्रमांकाची मते मिळाली. गुहागर आणि चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचा वारू रोखला. या दोन तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांचा प्रभाव दिसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूणचे प्रभावी नेते माजी आमदार रमेश कदम यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांच्या पक्षाला चिपळूणमध्ये एकही जागा मिळविता आली नाही. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांचाही कोणताच प्रभाव पडला नाही. खुद्द त्यांच्या पत्नी स्वाती चव्हाण यांना खेड तालुक्यातील भरणे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या स्वप्नाली पाटणे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. खेड तालुक्यातील आणखी एक नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव यांचा मुलगा सुबोध यालाही भोस्ते गटातून शिवसेनेचे सुनील मोरे यांनी धूळ चारली. आणखी एका धक्कादायक निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या भगिनी सौ. वसुंधरा राजेशिर्के यांचा चिपळूण तालुक्यातील त्यांच्या हक्काच्या सावर्डे गटातून पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांचे बंधू बाळशेठ जाधव यांनी शिवसेनेतून ही निवडणूक लढविली होती. त्यांनी सौ. राजेशिर्के यांचा पराभव गेला.

Post Comment