इस्तांबुल दहशतवादी हल्ल्यात दोन भारतीयांचाही मृत्यू
इस्तांबुल, दि. 02 - इस्तंबुलमध्ये झालेल्या हल्ल्यात एकूण 39 जण मृत्यूमुखी पडले असून, त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. मुंबईच्या राजकीय आणि सिनेवर्तुळात प्रसिद्ध असलेले आणि माजी राज्यसभा खासदार अख्तर हसन रिझवी यांचा मुलगा अबिस रिझवी यांचा इस्तंबूलमधील हल्ल्यात मृत्यू झालाय. तर गुजरातमधील खुशी शाह ही देखील हल्लेखोराच्या बंदुकीच्या गोळीचं सावज ठरली आहे.
अबिस रिझवी हे न्यू इयर सेलिब्रेशनसाठी इस्तंबूलला गेले होते अशी प्राथमिक माहिती आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दोन भारतीयही इस्तंबूल हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याची माहिती दिली.
दरम्यान अबिस रिझवी हे मुंबईतील सिनेवर्तुळातील प्रसिद्ध नाव आहे. हे वृत्त समजल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रिझवी यांच्या घरी भेट दिली. शिवाय दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनीही त्यांच्या घरी भेट दिली. इस्तांबुलमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रेना नाईटक्लबमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. पार्टी सुरु असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे दहशतवाद्यांनी सांताक्लॉजच्या वेशात येऊन हल्ला केला. रेना नाईटक्लबमध्ये पार्टीत शेकडो नागरिक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हजर होते.