पीकविमा भरण्यास 2 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
जालना, दि. 31 - खरीप हंगाम 2016 साठी अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगामाकरिता शेतकर्यांना पीकविमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2016 अशी होती. परंतू केंद्र शासनाने या पीकविमा भरण्याच्या मुदतीत वाढ केली असून 2 ऑगस्ट, 2016 पर्यंत हा पीकविमा भरता येणार असून शेतकर्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
Post Comment