भाजपच्या दलित खासदारांनो राजीनामा द्या : केजरीवाल

नवी दिल्ली, दि. 01 - भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांकडून दलित नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भाजपमधील सर्व दलित खासदारांनी राजीनामा द्यायला हवा, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. गुजरातमधील उना येथे गायीचे कातडे काढल्याच्या संशयावरून चार दलित नागरिकांना मारहाण करण्यात आली होती. देशभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. आता केजरीवाल यांनी भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये ही घटना घडल्याने भाजपला लक्ष्य केले आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उदीतजी आणि भाजपच्या सर्व दलित खासदारांनी देशभरात भाजप कार्यकर्त्यांकडून दलित नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राजीनामा दिला पाहिजे. भाजपचे खासदार उदित राज यांनी शनिवारी वक्तव्य केले होते, की तथाकथिक रक्षकांमुळे हिंदुत्व धोक्यात येत आहे.