‘मन की बात’मध्ये रिओ ऑलिम्पिकचीच चर्चा !
नवी दिल्ली, दि. 01 - रिओ ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ ची सुरूवातदेखील ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत केली.कोणताही खेळाडू एका रात्रीत घडत नसतो. त्यात अनेक वर्षांची मेहनत असते.त्यांना तुमच्या शुभेच्छांचीही तेवढीच गरज आहे. जिंकणे किंवा हरणे महत्त्वाचे नसून, ऑलिंपिकपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण ऑलिंपिकसाठी जाणार्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्यायला हव्यात.
रेडिओद्वारे देशवासियांशी संवाद साधण्याच्या मन की बात‘ या कार्यक्रमाचा आज 22 वा भाग होता. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, खोटी आमिषे आणि अवास्तव लाभ दाखवणारे ई-मेल आपण टाळायला हवेत.‘ तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टाकलेला हा एक दरोडाच असल्याचेही ते म्हणाले. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी कल्पना, सूचना आणि विषय सुचविण्यात आवाहन करताना मोदी म्हणाले, स्वतंत्र भारतात जन्मलेला मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे. येत्या 15 ऑगस्टला मी देशाला संबोधित करणार आहे. माझ्या भाषणासाठी मला तुमच्याकडून काही सूचना, कल्पना, विषय हवे आहेत. कृपया तुमच्या कल्पना मोबाईल ऍपवर किंवा मायगव्ह वर शेअर करा.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व अभियानांतर्गत गर्भवती महिलांसाठी आम्ही विनामूल्य वैद्यकीय तपासणीची योजना सादर करत आहोत. दर महिन्याच्या नऊ तारखेला महिलेची विनामूल्य वैद्यकीय तपासणी केली जाईल. या योजनेला हजारो डॉक्टरांनी सहमती दर्शविली असून लाखो डॉक्टरांनी या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे. वृक्षारोपणाच्या भव्य चळवळीत सहभागी व्हा. राजस्थान सरकारने 25 लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात येणार्या ‘डिजीटल फसवणुकी’ पासून दूर राहण्याचे आवाहन मोदी यांनी केले.

Post Comment