नाभिक समाज बांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न

 नाशिक/प्रतिनिधी। 29 - नाशिक येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या तसेच नाशिक महानगर सलुन असोसिएशनच्या वतीने महानगरातील कार्यक्रमाचा मेळावा दिंडोरी रोड, पंचवटी येथे राष्ट्रीय नाभिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 
या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाळासाहेब सानप यांनी उपस्थित राहून  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच पंचवटी भागात नाभिक समाजासाठी समाज मंदिर आमदार निधीतून बांधून देण्याचे आश्‍वासन दिले. या प्रसंगी सर्वश्री अशोक सुर्यवंशी, दिलीपराव जाधव, नारायण यादव, अनिल वाघ, राजेंद्र महाले यांचे मार्गदर्शन व भाषणे झालीत.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन सलुन असोसिएशनचे अध्यक्ष विजय पंडित यांनी केले. आभार प्रदर्शन संतोष रायकर यांनी केले. कार्यक्रमास अशोक निकम, संतोष वाघ, रमेश आहेर, अरूण सैदाने, जीवा सेनेचे अध्यक्ष समाधान निकम, अशोक चव्हाण, चंद्रशेखर रघुवंशी, योगेश मगर, संजय जांभळे आदि मान्यवर उपस्थित होते. 
सदरहू कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी दिपक जाधव, बाळु खोंडे, गणेश शिंदे, निलेश जाधव, शशि ठाकूर, अनिल वैद्य, महिंद्र अहिरराव, सुनिल जगताप, सुदाम ठाकरे, दत्तात्रय रायकर, करण पंडित, संतोष सोनवणे व गिरीष जांभळे यांनी परिश्रम घेतले.