Breaking News

महाटेक 2016 चे पुण्यात आयोजन नाशिक मधील 7 कंपन्यांचा सहभाग

 नाशिक/प्रतिनिधी। 29 - उद्योजकांची बुध्दीमत्ता विकसित करून व्यवसायातील क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक विचारसरणीची कास धरणे काळाची गरज आहे, हाच उद्देश ठेऊन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महाटेक 2016 चे आयोजन पुण्यात केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. 
चार दिवस चालणार्‍या या व्यावसायिक प्रदर्शनात आधुनिक उत्पादने, ुपकरणे पाहणअयाची संधी लाभणार आहे. दि. 4 ते 7 फेब्रुवारी 2016 दरम्यान कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचन नगर, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेदरम्यान हे प्रदर्शन भरणार आहे.महाटेक 2016 ला आयटीपीओची मान्यता मिळालेली असून त्याला उद्योग मंत्रालय, सरकार, कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ महाराष्ट्र आणि भारत आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स यांचे सहाय्य आहे. या प्रदर्शनात 300 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार असून तीस ते चाळीस हजार उद्योजक भेट देणार आहेत. या प्रदर्शनात भाग घेतलेल्या नाशिक मधील इंजिनियरिंग इंडस्ट्रिीज, सॅन्डफील्ड इंजिनियरिंग कंपनी प्रा. ली, टेक्रोक्राटस अ‍ॅकॅडमी ऑफ ऑटोमेशन अँड कंट्रोल टेक्रालजी, टेक्रोक्राटस सिस्टीम (आय) प्रा.ली. इलेक्ट्रॉनिक स्विचेस (आय) प्रा. लि. तिजारे इंजिनियर्स अँड कन्सलटेंट्स प्रा. लि. ड्रीम्स ऑटो फायबर ग्लास या नामांकित कंपन्यांचाही सहभाग आहे. याशिवाय औरंगाबादच्या सेलवेल एंटरप्राइजेस प्रा. लि. शक्ती डायमंड टूल्स, एक्वा इंडस्ट्रीस प्रा. लि., मार्क इंडिया मार्केटिंग सिस्टम्ससह या प्रदर्शनात जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान, आधुनिक उत्पादने, उपकरणे तसेच भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजकांचा समावेश असणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत व खुले असले तरी नोंदणी आवश्यक आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने गो ग्लोबल आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधी तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार यावर मार्गदर्शन करण्यात येईल.