20 नोव्हेंबरपूर्वी जि.प. शिक्षक बदल्या करा; प्राथमिक शिक्षकांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
नाशिक, दि. 20, नोव्हेंबर - जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया रद्द करावी यासाठी शिक्षकांनी मोर्चा काढल्यानंतर आता बदल्यांची प्रक्रिया तातडीने राबवावी या मागणीसाठी शिक्षकांनी 21 नोव्हेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला आहे.
शिक्षकांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने शिक्षक बदली संदर्भात घेतलेला निर्णय सर्व घटकांना समान न्याय देणारा आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही बदल्यांसाठी सकारात्मक निर्णय दिलेला आहे. या मुळे सर्व संवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया 20 नोव्हेंबरच्या आत राबवावी, अन्यथा उपोषणाचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

सर्व संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या प्रक्रिया राबवून त्यांना 20 नोव्हेंबरच्या आता कार्यमुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे. सध्या दुसरे सत्र सुरू झाले असून लवकरात लवकर बदली प्रक्रिया राबविल्यास विद्यार्थ्यांचेही शालेय नुकसान होणार नाही, असे स्पष्ट करून बदली प्रक्रिया न राबविल्यास 21 नोव्हेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला आहे.
Post Comment