नाशिक बाजार समिती बरखास्तीबाबत सहकारमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

नाशिक, दि. 20, नोव्हेंबर - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख हे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.संचालकांमध्ये यामुळे चलबिचल सुरू झाली आहे.संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या कारवाईबाबत जिल्हा उपनिंबधक कार्यालयाकडे अधिकृत पत्र प्राप्त झालेले नसल्याचे कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.


नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीच्या निर्णयाबाबत 14 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी जिल्हा उपनिंबधक कार्यालयात झाली होती. त्यावेळी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्याकडे संचालकांनी युक्तिवाद झाला. या युक्तिवादानंतर अहवाल सहकार खात्याकडे पाठविला जाणार होता. मात्र, दोन आठवडा हा अहवाल जिल्हा उपनिंबधक कार्यालयात पडून होता. त्यावेळी अनेत प्रश्‍न उपस्थित झाले. अखेरला 19 ऑगस्ट रोजी हा अहवाल पणन महामंडळाकडे पाठविण्यात आला होता. त्यामुळे पणन महामंडळ नेमका काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागले होते. भाजपाकडून दबाबसाठी बरखास्तीची धास्ती दाखविली असल्याचा आरोप विरोधकांनी करण्यास सुरूवात केली होती. 

पणन महामंडळाची बैठक पुणे येथे पार पडली. या बैठकीत, नाशिक बाजार समिती बरखास्तीवर चर्चा झाली. बाजार समितीतील संचालक मंडळाने केलेला गैरव्यवहार, अनियमित कामकाज असा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावर चौकशी समिती नेमून चौकशी झाली होती. या चौकशी अहवालात अनिमयमता झाल्याचे सांगत, समिती बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यावर बाजार समितीला नोटीस पाठविण्यात आली आहे. संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख हे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्यासह संचालक मंडळाचे लक्ष लागले आहे.