इंटर्नशिप करणारे डॉक्टर संपावर;15 हजार रू. वेतनाची मागणी


पुणे - वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप करणारे सर्वच विद्यार्थी संपावर गेले आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयातील बी जे मेडिकलचे 180 डॉक्टर आजपासून संपावर आहेत. तर राज्यातील 2100 इंटर्न डॉक्टर संपावर गेले आहेत. सध्या इंटर्नशिप करणार्‍या विद्यार्थ्यांना महिन्याला 6 हजार रुपये वेतन दिले जाते. या वेतनात वाढ करून किमान 15 हजार रूपये देण्यात यावे. ही प्रमुख मागणी या इंटर्न डॉक्टरांनी केली आहे. प्रत्येक वेळी फक्त आश्‍वासन देण्यात आले, मात्र ती पूर्ण झाली नाहीत. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप असाच चालू राहील अशी भुमिका या इंटर्न डॉक्टरांनी घेतली आहे. मात्र, ससूनमधील वैदयकीय सेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले आहे.