आरक्षणवादी आणि आरक्षणविरोधी गटात दंगली घडवण्याचा डाव
मुंबई - हिंदू-मुस्लीम समाजात दंगे घडवण्यात आता यश येत नाही. म्हणून आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी गटात सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्यात आली, असे म्हणत सरकारवर हल्ला चढवला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, हिंदू-मुस्लीम समाजात दंगे घडवण्यात आता यश येत नाही. म्हणून आरक्षणवादी आणि आरक्षणविरोधी गटात सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी यावेळी केला. आरक्षणविरोधी शक्तींना सरकार खुले आम मदत करत आहे, असा हल्लाही त्यांनी यावेळी चढवला.
केवळ जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट असल्याची आवई उठवली जात आहे. मोदी सद्या 7 झोन सिक्योरिटीमध्ये आहेत. त्यांची सिक्योरिटी 14 झोनची करा, असेही ते पुढे म्हणाले.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. कोरेगाव भीमाची दंगल भडकवण्यात दोषी असलेले भिडे आणि एकबोटे यांना क्लीन चीट देण्यात येते आहे. उलट एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक होते. एल्गार परिषदेचा दंगलीशी काहीही संबंध नाही. ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा कोरेगाव भीमा दंगलीशी कसा संबंध आहे? याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणीदेखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली आहे. 31 डिसेंबर 2017ला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषद झाली होती. या परिषदेत चिथावणीखोर भाषणे देऊन गाणी गायली गेली होती, असा संशय पोलीस तपास यंत्रणांना आहे. शनिवारवाडा येथे पार पडलेल्या कार्यक्रमानंतर दुसर्याच दिवशी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार उसळला होता. पुण्यातील एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळे यांना त्यांच्या मुंबईतील गोवंडी येथील घरातून पुणे पोलिसांनी अटक केली. त्याचबरोबर वकिल सुरेंद्र गडलिंग आणि राना जेकब यांना दिल्लीतून अटक करण्यात आली. रोनी विल्सन यांनाही यापूर्वी याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात आहेत, असा आरोप करण्यात येत होता.
सहानूभुतीसाठी पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाची आवई
हिंदू-मुस्लीम समाजात दंगे घडवण्यात आता यश येत नाही. म्हणून आरक्षणवादी आणि आरक्षणविरोधी गटात सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी यावेळी केला. आरक्षणविरोधी शक्तींना सरकार खुले आम मदत करत आहे, असा हल्लाही त्यांनी यावेळी चढवला. केवळ जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट असल्याची आवई उठवली जात आहे. मोदी सद्या 7 झोन सिक्योरिटीमध्ये आहेत. त्यांची सिक्योरिटी 14 झोनची करा, असेही ते पुढे म्हणाले.