पंतप्रधान आवास योजना हायब्रीड लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून कार्यान्वीत करण्याची मागणी


अहमदनगर - पंतप्रधान आवास योजना म्हाडाकडे वर्ग झाल्याने, ही योजना राबविण्यासाठी हायब्रीड लॅण्ड पुलिंगचा वापर करण्याच्या मागणीसाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचे शिष्टमंडळ म्हाडा अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.29 मे रोजी होणार्‍या बैठकिसाठी रवाना होणार आहे. म्हाडा कार्यालयातील पंतप्रधान आवास योजनेचे प्रमुख मोगलीकर यांच्याशी घरकुल वंचितांचे घरे साकार होण्यासाठी हायब्रीड लॅण्ड पुलिंगचा वापर करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. 

हायब्रीड लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शहरी भागात दहा लाख घरे अतिशय स्वस्तात बांधण्याचा मार्ग मोकळा होणार असून, या पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत करण्यासाठी हायब्रीड लॅण्ड पुलिंगशिवाय पर्याय नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.