शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश


अहमदनगर - शालार्थ वेतन प्रणालीच्या तांत्रिक बिघाडाचा फटका शिक्षकांना बसून, त्यांच्या वेतनाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शासन दरबारी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शिक्षकांचे मे ते जुलै महिन्याचे वेतन ऑफलाईनने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, भगवंतराव साळुंखे, बाबासाहेब काळे आदिंसह राज्यकार्यकारणी पदाधिकार्‍यांनी शिक्षकांचा वेतनाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेवून या प्रश्‍ना संदर्भात चर्चा केली होती. तावडे यांनी सदर प्रश्‍न लवकरच निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले असता, या संदर्भात शासन निर्णय निर्गमीत झाल्याने शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
 
शालार्थ वेतन प्रणालीत दोष निर्माण झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा वेतनाचा प्रश्‍न गंभीर बनला होता. या कर्मचार्‍यांचे वेतन ऑफलाईन पध्दतीने अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शालार्थ प्रणाली अद्यापही सुरु न झाल्यामुळे सदरील कर्मचार्‍यांचे मे ते जुलै 2018 या महिन्यांचे वेतन देखील ऑफलाईन पध्दतीने अदा करण्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे. या निर्णयाचे शिक्षक परिषदेचे नाशिक विभागाध्यक्ष प्रा.सुनिल पंडित, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, ग्रामीणचे अध्यक्ष शरद दळवी, शशीकांत थोरात, विनायक कचरे, सचिव तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारुडकर, अशोक झिने, श्रीकृष्ण पवार, बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर सर, उकिर्डे सर, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे आदिंनी स्वागत केले आहे.