दिल्लीत रेस्टॉरंट-बारमध्ये रेकॉर्डेड गाण्यांवर बंदी.


नवी दिल्ली : येथील रेस्टॉरंट व बारमध्ये रेकॉर्डेड संगीत वाजवण्यास दिल्ली सरकारने बंदी घातली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंट व बारमालकावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील अनेक रेस्टॉरंट व बारमध्ये प्रत्येक दिवशी सुरू असलेल्या गोंधळाचा व आरडाओरडीचा त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी उत्पादन शुल्क विभागाला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाचे पथक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंट व बारमालकांवर कारवाई करणार असल्याची माहिती यावेळी उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली