अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त निमगाव वाघा येथे निबंध स्पर्धेचे आयोजन


अहमदनगर - नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था तसेच श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने गुरुवार दि.31 मे रोजी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच तंबाखू विरोधी सेवन दिन असल्याने समाजात वाढत चाललेली व्यसनाधिनता कमी होण्यासाठी तंबाखूचे दुष्परिणामाची जनजागृती होण्यासाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी व्याख्याणाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे व सचिव मंदाताई डोंगरे यांनी दिली.
आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेसाठी तंबाखू व धुम्रपानाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हा विषय देण्यात आला असून, निबंध स्वच्छ हस्ताक्षरामध्ये एक हजार शब्दात लिहायचे आहे. निबंध स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सदर निबंध स्पर्धेत युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होवून सोमवार दि.28 मे पर्यंन्त संस्थेच्या निमगाव वाघा (ता.जि. अहमदनगर) पि.नं. 414005 येथील कार्यालयात लिहिलेले निबंध पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी डोंगरे यांच्याशी या नंबरवर 9226735346 संपर्क साधावा. जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, जिल्हा युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे, गौतम फलके, मयुर काळे, सोमनाथ डोंगरे, पै.वैभव पवार, सुभाष डोंगरे परिश्रम घेत आहे. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी व क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.