गाडी धुण्याच्या कारणावरून जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे (प्रतिनिधी)। 15 - चार चाकी गाडी धुण्याच्या कारणावरून वाद होऊन चौघांनी मिळून एका व्यक्तीस लोखंडी पाईपने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) सकाळी सव्वा नऊ वाजता आंबेगाव बुद्रुक येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत नलावडे यांच्या सोसायटीमध्ये चार चाकी गाड्या धुण्याच्या कारणावरून वाद होऊन श्रीधर कोरडे (वय वर्षे- 22), सुजीत दरेकर (वय वर्षे 24 रा. धनकवडी), सुरेश पाटील ( वय वर्षे - 40 रा. आंबेगाव-खुर्द), राहुल सूर्यवंशी (वय वर्षे - 20, धनकवडी) यांनी अभिजीत नलावडेस लोखंडी पाईपने व बांबूने पाठीवर व हातावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे अभिजीत यांचे भाऊ गणेश नलावडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्हि. के. सूर्यवंशी करीत आहेत.