सनरायजर्सवरील विजयाचे श्रेय डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीला - गिल


हैदराबाद : प्रसिद्ध कृष्णाच्या नेतृत्वाखाली 'डेथ ओव्हर्स'मधील शानदार गोलंदाजीमुळेच आमच्या संघाला सनरायजर्स हैदराबादविरुद्धचा शनिवारचा सामना जिंकण्यात यश मिळाले, असे मत कोलकाता नाईट रायडर्सचा युवा फलंदाज शुभमन गिल याने व्यक्त केले आहे. . 

केकेआरने सनरायजर्सला पाच गडी राखून पराभूत करताना आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले. त्यांनी सनरायजर्सला ९ बाद १७२ धावांवर रोखले तसेच दोन चेंडू शिल्लक ठेवून विजयी लक्ष्य साध्य केले. गिलने सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ज्या प्रकारे 'डेथ ओवर्स'मध्ये गोलंदाजी केली, तोच सामन्याचा 'टर्निंग पॉइंट' ठरला.