देसवंडी ग्रामपंचायत निवडणूक वादाच्या भोवऱ्यात?
तालुक्यातील देसवंडी ग्रामपंचायतीत कायमच तनपुरे - खेवरे समर्थकांनी वर्चस्व ठेवत गड राखला आहे. राहुरी तालुक्यात ११ ग्रामपंचायत निवडणुकीची धामधुम सुरु आहे. यामध्ये निवडणुक निर्णय अधिकारयांना उमेदवारी करत असलेल्या काही उमेदवारांनी चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल केल्याचे बोलले जात आहे. यामधे सामाजिक कार्यकर्त्यांनी संभाव्य उमेदवारांची माहिती मागितली आहे. यामध्ये कोणकोणत्या उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारयांना खोटी माहिती दिली, हा प्रकार उघड होणार आहे. सदर प्रकरणामुळे देसवंडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. या उमेदवारांममध्ये दोघे ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य असल्याचे बोलले जात आहे. हे आजी माजी सदस्य कोण, याची चर्चा होत आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक २७ जून रोजी होणार असून या प्रकरणाने निवडणूक कोणते वळण घेणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
Post Comment