'मिशन ऑल आऊट' अंतर्गत तिघांना अटक
संगमनेर/प्रतिनिधी।शहर पोलिसांनी 'मिशन ऑल आऊट' अंतर्गत कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून धारदार शस्त्रांसह तीन आरोपी ताब्यात घेतले. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरून रात्री दोनच्या सुमारास शहरातील लक्ष्मीनगर भागात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी या कारवाईत निलेश देविदास मोहारे याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. त्याच्याकडून एक फूट लांबीचा चाकू व दोन फूट लांबीचा जंब्या अशी दोन धारदार हत्यार जप्त करण्यात आली. तर दुसऱ्या कारवाईत अकोले बायपास येथील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे दोन संशयितांकडून दोन फुटाची धारदार तलवार मिळून आली. यामध्ये जालिंदर नवनाथ बोराडे {रा. जाफराबाद ता. श्रीरामपूर} व सुनील संजय खोडसणे {रा. वडाळा महादेव ता. श्रीरामपूर} यांना अटक करण्यात आली. या तिघाही आरोपींविरुद्ध आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी विजय खाडे व दत्तात्रय गोरे करीत आहेत.

Post Comment