चार वर्षांत ४६ लाख घरांना मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ४ वर्षांत ४६.८६ लाख घरांना मंजुरी दिली आहे. यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार(संपुआ)च्या १० वर्षांच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी(रालोआ) सरकारच्या काळात घरांच्या मंजुरीचे प्रमाण तब्बल २४० टक्क्यांनी वाढले आहे. काँग्रेस खासदार के. सी. वेणूगोपालन यांनी आवास योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित मंत्रालयाने ही माहिती दिली.
Post Comment