अवैध वाळू वाहतूक करणार्या 11 वाहनांवर महसूल विभागाची कारवाई
पुणे, दि. 27, नोव्हेंबर - दौंड तालुक्यातून भीमा नदी व ओढ्यामधून करण्यात येणार्या अवैध वाळू वाहतुकीवर दौंड महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. काल रात्रीच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर यवत, चौफुला, वरवंड आणि पाटस परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणारे 11 ट्रक पकडण्यात आले आहेत.
सर्व वाहने महसूल विभागाने जप्त करून एका वाहनावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत दौंडचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसिलदार धनाजी पाटील, मंडलाधिकारी विजय धांडोरे, तलाठी रविंद्र होले, अभिमन्यू जाधव यांच्यासह आदी महसुल विभागाच्या कर्मचारी व पोलिसांनी ही कारवाई केली.