Breaking News

विजय मकासरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर


राहुरी वि. प्रतिनिधी - श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७६, ४९५ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात विजय मकासरे यांना न्यायलयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

मकासरे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा कमी व्हावी आणि बदनामी व्हावी, या हेतुने त्याचप्रमाणे अन्य लोकांच्या दडपणामुळे फिर्याद दाखल झाल्याचे मकासरे यांनी अॅड. जयंत जोशी यांच्यामार्फत न्यायालयासमोर म्हणणे मांडले. अॅड. जोशी यांनी सदर प्रकरण हे बलात्कारचे नसल्याचे व बलात्काराच्या व्याख्येत येत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हा व सत्र न्यायालय यांनी उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून व सर्व कागदपत्रांची व पुराव्यांची पडताळणी करून मकासरे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. मकासरे यांच्यावतीने अँड. जयंत जोशी, अँड. स्मिता जोशी, अँड. व्ही. पी. खिस्ते, अँड. एस. डी. भुजबळ, अँड. योगेश दाभाडे यांनी काम पाहिले. मकासरे हे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राजकीय व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात.

तृप्ती देसाई व इतर लोकांविरोधात त्यांनी लूटमार करून मारहाण केल्याचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरु होता. न्यायप्रविष्ट असलेल्या या गुन्ह्यात तृप्ती देसाई यांनी मकासरे यांना अटक व्हावी, यासाठी पोलीस ठाण्यात निवेदनही दिले होते.