महात्मा फुले यांनी शिक्षणाची गंगा पोहोचवली : पिपाडा
राहाता (प्रतिनिधी - शिक्षणाने माणूस बदलतो, हे महात्मा फुले यांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी शिक्षणाची गंगा गरीबाच्या घराघरापर्यंत पोहचवली, असे प्रतिपादन नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी केले. राहाता नगरपालिकेत महात्मा फुले जयंतीनिमित्त त्या बोलत होत्या.
महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती राहाता नगरपालिकेत साजरी करुन त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले यावेळी राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा, भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, धनंजय गाडेकर, राजेंद्र गाडेकर, नगरसेविका डॉ. मंगला गाडेकर, निलम सोळंकी, विमल आरणे, निवृत्ती गाडेकर, अनिता काळे, शिवसेना शहरप्रमुख गणेश सोमवंशी, मनसेचे विजय मोगले, डॉ. स्वाधीन गाडेकर, दिपक सोळंकी, अभिजित काळे आदींसह नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
नगराध्यक्षा पिपाडा म्हणाल्या, भारतीय समाजसुधारणेचे जनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना मानले जाते. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रिबाई फुले या दोघांनी मिळून केले.