तालुक्यातील मोहरी रोडवरील भापकर वस्ती येथे दुचाकीवर मोहरीकडून येणार्या दत्तू रूपनर (रा. हंडाळवाडी) (वय अंदाजे 50), आणि पाथर्डीकडून दुचाकीवर येणार्या बाळू दारकुंडे, रा. माका (वय 40) यांच्यामध्ये झालेल्या समोरासमोर धडकेत उपजिल्हारुगण्यालयात दाखल केल्यानंतर मेंदूला मार लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल सायं. 6.45 च्या दरम्यान घडली.
याबाबत प्राथमिक समजलेली माहिती अशी की, सायंकाळी मोहरीकडून मोटरसायकलवर रूपनर व त्यांची सून हे हंडाळवाडीकडे जात असताना आणि पाथर्डीकडून मोहरीकडे मोटरसायकलवरून जाणार्या बाळू दारकुंडे आणि अमृत वाघमोडे हे दोघे गाडीवर जात असताना समोरसमोर झालेल्या धडकेत डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना नागरिकानी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आले नसून डॉ. के. चव्हाण यांनी त्यांना मृत घोषित केले. तर रूपनर यांच्या गाडीच्या मागे बसलेली सून व दारकुंडे यांच्या मागे बसलेल्या वाघमोडे यांच्या नशिबाने ते सुदैवाने वाचले असुन चांगलेच जखमी झाले आहेत.

Post Comment