श्रीरामपूर तालुका टॅक्सी असोसिएशनच्यावतीने टॅक्सी बंद

कठुआ, उन्नाव, सुरत येथील गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी श्रीरामपूर तालुका टॅक्सी असोसिएशनच्यावतीने टॅक्सी बंद ठेवून शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना अध्यक्ष सुनिल मुथ्था यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.




यावेळी काळी-पिवळी टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथ्था म्हणाले की, देशात कठुआ मधील 8 वर्षाच्या लहान बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून करणारी ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. तसेच सुरत (गुजराथ) मध्येही असाच प्रकार घडला आहे. तर उन्नाव (उत्तरप्रदेश) मध्ये तरुणीवर अत्याचार झालेले आहेत. देशाच्या अनेक भागात असे अत्याचार होऊन महिला व मुली बळी जात आहेत. या घटनामुळे देशाची मान जगात शरमेने खाली जात आहे. 
कठुआमधील अल्पवयीन बालिकेवर झालेला अत्याचार हे मानवतेला काळीमा फासणारे आहेत. या प्रकरणासह अत्याचार झालेल्या आरोपींना केंद्र शासनाने देहदंड, शिरच्छेद अशाप्रकारची शिक्षा असणारा कायदा अंमलात आणावा व या गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी स्वीकारले. त्यावेळी गोपनीय खात्याचे कॉन्स्टेबल सतिष गोरे आदिंसह टॅक्सी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक शिंदे म्हणाले की, आपल्या भावना निश्‍चितच शासनापर्यंत पोहोचविण्यात येतील. 
या निवेदनावर तालुका टॅक्सी असोसिएशचे अध्यक्ष सुनिल मुथ्था, संदिप मगर, सादिक शेख, सलीम कुरेशी, इज्जृू इनामदार, जिना शेख, मुश्ताक शेख, साहेबराव गायकवाड, रवि पगारे, मुक्तार शेख, महंमद पटेल, अण्णा काळे, अजय शेळके, भैय्या शेळके आदींच्या सह्या आहेत.