अजितेशच्या निधनाने बोरनरे कुटुंबावर शोककळा


कोपरगाव : येथील अजितेश राजेंद्र बोरनरे {रा. सवंत्सर, कोपरगाव} या युवकाचे वयाच्या २१ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. अजितेश हा प्रगतशील शेतकरी राजेंद्र बोरनरे यांचा एकुलता एक मुलगा तर कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक दिलीप बोरनरे यांचा पुतण्या होता. 

अजितेश याच्यावर पुण्यात दि. २ मार्चला रुबी हॉलमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली होती. मात्र शस्त्रक्रिया करुनही बोरनरे कुटुंबाला अपयश आले.त्याचे शिक्षण मेकॅनिकल डिप्लोमा झाले होते. आजारपणामुळे त्याला पुढील शिक्षण थांबावे लागले होते. त्याच्या जाण्याने बोरनरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी शोक व्यक्त केला.