Breaking News

पारनेर महाविद्यालयात सर्टिफिकेट कोर्सचे यशस्वी आयोजन


पारनेर /प्रतिनिधी /- इलाईट सॉफ्टवेअर प्रायवेट लिमिटेड, पुणे. यांच्या सहयोगातुन संगणक शास्त्र, न्यू आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर यांनी वेबसाइट डेव्हलपमेंट आणि होस्टींग असा सर्टिफिकेट कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला.

या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले कि, मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने वेबसाइट तयार करण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात अधिकाधिक चांगल्या प्रकारे करिअरच्या संधी उपलब्ध होतील. कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे यांनीही मुलांमधील कौशल्य विकसित होऊन त्यांना स्वयंरोजगाराचेही साधन उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.

इलाइट सॉफ्टवेअरचे प्रोजेक्ट मॅनेजर सागर तारडे म्हणाले कि, विद्यार्थ्याना वेबसाइट डेव्हलपमेंटसाठी या पुढील काळात जी मदत लागेल ती आम्ही पुरवू. आजच्या काळातील विद्यार्थी हा अधिकाधिक माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सक्षम होत जावा हीच भूमिका हा कोर्स आयोजित करण्यामागे होती. यावेळी म्हस्के हर्षद, गवळी ऋषिकेश, हांडे प्रियांका , वराळ दिनेश , लंके मनीषा, लामखडे दिनेश, ढगे स्नेहल व ठुबे पूजा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.