Breaking News

मुख्याध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा


तालुक्यातील घुलेवाडीच्या जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षिकेचा हात धरुन तिचा विनयभंग केल्याच्या कारणावरुन शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीष दगडू विटेकर असे या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. विनयभंग झालेल्या शिक्षिकेने शहर पोलिस ठाण्यात बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरुन मुख्याध्यापक विटेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. घटनेनंतर आरोपी विटेकर फरार झाला. गेल्या दोन वर्षापासून संबधित या शिक्षिकेला मुख्याध्यापक विटेकर हा तिच्याकडे सारखे पाहत राहणे, टॉयलेटसाठी चावी न देणे, फिर्यादी शिक्षिका उघड्यावर टॉयलेटला जात असतांना तिच्या मागे जाणे, चावी देतांना हातांना स्पर्श करणे असे प्रकार करत असे. बुधवारीदेखील त्याने या शिक्षिकेचा हात धरुन विनयभंग केल्याने अखेरीस तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेमुळे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.