पत्नीस मारु नको म्हटल्याने कु-हाडीने सासुचे बोट तोडले जावयास अटक


उक्कलगांव प्रतिनिधी ;- श्रीरामपुर तालुक्यातील कारेगांव येथे पत्नीच्या घरी जाऊन नांदण्याच्या कारणावरुण बाबासाहेब भास्कर थोरात {रा. उक्कलगांव} याने पत्नीला मारहाण केली. दरम्यान, तिची आई आरोपीची सासू जिजाबाई तुकाराम औटी {रा. कारेगांव} या ही मारहाण सोडविण्यास गेल्या असता आरोपी बाबासाहेब थोरात याने त्यांच्यावर वार केला. कु-हाडीचा घाव हातावर बसल्याने यांचे बोटांची कांडीच तुटली. यावेळी आरोपीने सासूला ठार मारण्याची धमकी दिली. जखमी सासू जिजाबाई औटी यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्यालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पो. नि. पथवे यांच्या मार्गदर्शनखाली आरोपी थोरात याला अटक करण्यात असून पुढील तपास स. फौ. ससाणे करीत आहेत.