चार्‍यांच्या दुरवस्थेमुळे पाण्याचा अपव्यय


ज्या भागात पाणी सुटले, तेथे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय झाला.सिंचन विभागाकडून तयार करण्यात आलेल्या अनेक उपचार्‍या बुजलेल्या आहेत. तर काही चार्‍यांची कामे अपूर्ण असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली. माळराने तसेच रस्त्यावरून पाणी वाहत जावून पाण्याचा अपव्यय कुकडीचे अधिकारी, कर्मचारी यांना रोखता आला नाही. पाण्याचे व्यवस्थीत व काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकारी देतात, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत.