Breaking News

विजबिल भरुनही रोहीत्रासाठी सवंत्सरच्या शेतकऱ्याची महावितरणला विनवणी


यावर्षी विहीरींत समाधानकारक पाणी असुन,कालव्यांना आवर्तनेही येऊन गेली.पिके अंतिम टप्प्यात आहे.परंतु महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची सत्वपरिक्षा बघण्याचे कारस्थान मात्र थांबण्याचे नावच घेत नाही.दात आहे तर चणे नाही आणि चणे आहे तर दात नाही आशी व्दिधा अवस्था झाल्याची खंत सवंत्सरचे शेतकरी अशोक लोहकणे यांनी दै.लोकमंथनकडे व्यक्त करुन महाविरण कंपनीने विजबिल थकीत नसतानाही इतरांच्या थकबाकीपोटी नादुरुस्त रोहीत्र बदलून देत नसल्यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करण्याची वेळ आली आहे.

सवंत्सर शिवारातील रोहीत्र नंबर ४२०६२०३रोहीत्र पाच ते सहा दिवसांपुर्वी नादुरुस्त आहे.या रोहीत्रावरील चार शेतकरी वगळता इतर बाविस शेतकऱ्यांची विजबीले थकबाकीत आहे.मात्र अशोक भाऊसाहेब लोहकणे यांचेकडे महावितरणाची कुठलीही थकबाकी नाही.केवळ थकबाकी वसुलीच्या कारणाने महावितरणाने रोहीत्र बदलुन देण्यास हात वर केले तर एका बाजुला बहुतांशी शेतकऱ्यांचे पिके उभी नसल्यामुळे तेही थकबाकीकडे कानाडोळा करत आहे.अशा परिस्थितीत लोहकणेंनी एक एकर ऊसात रासायनिक खते टाकुन चार पाच दिवस झाले.महावितरणचे कनिष्ठ अभियंता जे.जे.बोरसे यांच्या सवंत्सर कार्यालयात चक्कर मारत असुनही त्यांच्या हातात ही बाब नसल्याने ते मात्र वरीष्ठांकडे बोट दाखवत आहे.