डिजिटल युगात सायबर सुरक्षा महत्वाची - अपर पोलीस अधिक्षक चव्हाण
पालघर, दि. 21, जानेवारी - आजच्या डिजिटल युगात सर्व सेवा ऑनलाईन होत आहे. मात्र इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगारी वाढते आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वांनी सायबर सुरक्षा पाळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण यांनी केले.
ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियानाचे सेंट जॉन महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना चव्हाण म्हणाले इंटरनेटच्या वाढत्या वापरासह सायबर गुन्हेगारांनी गुन्हे करण्याच्या नवनवीन पध्दती शोधून काढल्या आहेत. यामुळे लोकांचा पैसा आ णि खासगी गोपनीयतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्याबाबत जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.
अँक्सिस बँकचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट निशिकांत उपाध्ये यांनी या कार्यशाळेत फिशिंग, हॉकिंग, नायजेरियन फ्रॉड, सायबर बुलिंग, डेटा चोरी, फ्रिटटोग्राफी याबरोबरच बँक व्यवहार करतांना घ्यावयाची काळजी, सोशल मिडीयाचा वापर करतांना काय करावे काय करु नये यांबाबत दृकश्राव्य माध्यमांद्वारे मार्गदर्शन केले.

Post Comment