रोटरीच्या निबंध, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धन, इंधन बचत व स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग लाभला.


या स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मिसेस इंडिया अर्थ फेमस डॉ.मीना पोटे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ.प्राची पाटील, सचिव सुजाता तुवर, प्रतिभा धूत,यास्मीन जालनावाला, वैशाली कोलते, ज्योती पिसुटे, रिटा झंवर, माधुरी सारडा, आरती लोहाडे, मनिषा आठरे, डॉ.ममता डुंगरवाल, अपेक्षा झालानी, मृणाल शिंदे, अंजली वामन, गीता गिल्डा आदि उपस्थित होत्या.
डॉ.प्राची पाटील म्हणाल्या की, विद्यार्थी दशेतच मुलांमध्ये पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेबाबत जागृती निर्माण झाल्यास मोठा क्रांतीकारक बदल होणार आहे. पर्यावरणाचे प्रश्‍न जागतिक बनले असून, हे प्रश्‍न सोडविण्यासाठी विद्यार्थी व युवकांमध्ये जनजागृती करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी मिसेस इंडिया डॉ.मीना पोटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, इंधन बचत व स्वच्छतेचे महत्त्व विषय देण्यात आला होता. 

या स्पर्धेत सेंट मायकल स्कूल, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, आयकॉन पब्लिक स्कूल, स्नेहालय, आठरे पाटील पब्लिक स्कूल, पंचशील विद्या मंदिर, डॉ.शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कूल, हिराबाई सुर्यवंशी विद्यालय, रामकृष्ण इंग्लिश मिडीयम स्कूल, कै.वि.ल. कुलकर्णी शाळा आदिंसह शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.