पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रीन टॅक्स आकारण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- एकविसाव्या शतकात पर्यावरण समस्येचे सर्वात मोठे संकट देशापुढे उभे ठाकले असून, शत्रुराष्ट्रांच्या आक्रमणापेक्षाही जास्त भिती प्रदुषणाने निर्माण झाली आहे. या पर्यावरणाच्या संकटाला तोंड देण्यासाठी पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने ग्रीन टॅक्स आकारण्याची व अधिक वाहने बाळगणार्यांवर मार्यादा आनून, त्यांच्याकडून दुपटीने ग्रीन टॅक्स वसुल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्लोबल संडे सर्व्हिस राबविण्यास संघटनेने पुढाकार घेतला असल्याची माहिती अॅड.कारभारी गवळी यांनी दिली.
दिल्लीच्या प्रदुषणामुळे देशातील पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठ्या शहरात वाहनांच्या वाढत्या संख्येने ट्रॅफिक व प्रदुषणाचा प्रश्न भेडसावत असताना, नागरिकांमध्ये फुप्फुसाच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. श्रीमंत कुटुंबात चार चाकी व दुचाकी वाहनांची संख्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रमाणात झाली आहे. यामुळे शहरे प्रदुषणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. यासाठी विजेवर चालणारे वाहन काळाची गरज बनली आहे. या ग्रीन टॅक्सच्या माध्यमातून मेट्रो ट्रेनची सुविधा, वृक्षरोपण व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून खर्च करता येणार आहे. या टॅक्समध्ये शेतकर्यांना सवलत देवून, एका कुटुंबात अनेक वाहने वापरणार्यांवर मर्यादा आनून, त्यांच्यावर दुप्पट ग्रीन टॅक्स आकारण्याची व मोठ्या प्रमाणात झाड लावणार्यांना कार्बन क्रेडिट योजनेद्वारे पैसे देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोटार गाड्या आधार लिंक केल्यास कोणाच्या नांवावर किती गाड्या आहे. याची माहिती मिळणार आहे. वाहन घेण्याचा अतिरेक वाढला असून, आपली श्रीमंती दर्शविण्यासाठी अनेक व्यक्ती मजेखातर वाहनांची खरेदी करत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. यासाठी लोकशिक्षणाची आवश्यकता असून, ही मोहिम यशस्वी करण्यासाठी ग्लोबल संडे सर्व्हिस उपक्रम राबविण्यात येणार आहे. ग्लोबल संडे सर्व्हिस मध्ये सकाळी 6 ते 8 वाजे दरम्यान झाडांना पाणी घालून, परिसरातील प्लास्टिकचा कचरा उचलला जाणार आहे. तसेच वृक्षरोपण, संवर्धन, इंधन बचत व प्लास्टिकमुक्तीसाठी जनजागृती केली जाणार आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांना सहभागी करुन प्रचार व प्रसार केला जाणार असून, ही मोहिम यशस्वी करण्यासाठी दिल्लीचे सामाजिक कार्यकर्ते प्रभु नारायण, अॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, कॉ.बाबा आरगडे, वीरबहादुर प्रजापती, प्रकाश थोरात आदि प्रयत्नशील आहे.
Post Comment