कोपरगाव मनसेकडून बँकांना मराठीत व्यवहार करण्याची तंबी
कोपरगाव ता. प्रतिनिधी पाच डिसेंबर २०१७ ला पारीत झालेल्या शासन निर्णयानुसार कोपरगाव मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील बँक अॉफ इंडीयाच्या शाखेत जाऊन मराठीत व्यवहार करण्याची तंबी देऊन शाखाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की,बँकेचे व्यवहार मराठी भाषेतच झाले पाहीजे.तसा उच्च न्यायालयाचा आदेश असुन,संपुर्ण व्यवहार हा मातृभाषेतच झाला पाहीजे.बँकेचे चलनदेखील मराठीत असावे.अशिक्षित,शेतमजुर,शाळेच्या विद्यार्थ्यांना हिंदी ,इंग्रजी भिषेमुळे मोठा मनस्ताप होतो.त्यात आधिकारी परप्रांतीय असल्यास विनाकारण वादविवाद होतात तरी आठ दिवसांच्या आत मराठी भाषेची अंमलबजावणी व्हावी अन्यथा मनसेसैनिक बँक प्रशासनाला मराठी भाषेची शिकवणी देऊन मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे नमुद केले आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनावर शहराध्यक्ष सतिष काकडे,तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,सुनील फंड,राधू मोहीते,अनिल गाडे,विजु सुपेकर,प्रमोद लाहोरे,संजय जाधव,सचिन खैरे,रोहीत एरंडे,सुनील सुपेकर,अशोक दुसाने,नितिन दवंगे,चैतन्य गोंदकर आदींच्या सह्या आहेत.

Post Comment