प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला मंजुरी : आ. कर्डिले
राहुरी प्रतिनिधी - राहुरी नगरपालिकेच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मुळा धरणातून पाणी उचलण्यासाठी राज्य शासनाने मंजूरी दिल्याने योजना मार्गी लागली आहे, अशी माहिती आ. शिवाजी कर्डिले यांनी दिली. ते म्हणाले, की गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांच्याकडून राहुरी नगरपरिषदेला मुळा धरणाच्या जलाशयातून घरगूती वापराच्या प्रयोजनासाठी वाढीव पाणी आरक्षणाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्राप्त झाला होता.
त्यानूसार २०१३ सालची लोकसंख्या विचारात घेऊन पाणी उचलण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे. राहुरी नगरपालिकेच्या सुमारे २७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला या कारणामुळे गती मिळणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून राहुरी नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी आ. कर्डिले शासन दरबारी प्रयत्न करत आहेत. या योजनेस मुळा धरणातून पाणी उचलण्यास राज्यशासनाने संमती दर्शविल्याने सदर योजना आता मार्गी लागणार असल्याचे आ. कर्डिले म्हणाले.
Post Comment