कडाक्याच्या थंडीत गरजूंना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ब्लॅकेटची ऊब

नाशिक, दि. 29, डिसेंबर - नाशिकमधील वाढती कडाक्याची थंडी बघतेही प्राण जावू नये या उद्देशाने शहरातील रस्त्यावर राहण्यार्‍या गरीब व गरजू कुटुंबातील सदस्यांना राष्ट ्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी आज ब्लॅकेट वाटप केले.


नाशिकमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून थंडीचा तडाखा वाढत जात असून पारा नऊ अंशाखाली घसरला आहे. यातच कडाक्याच्या थंडीमुळे उबदार कपड्यांचा आधार घेणे सर्वाना गरजेचे पडले आहे. थंडीचे अजून दोन महिने बाकी असून पुढील महिन्यात तापमान अजून खाली जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. रस्त्यावर राहणारे गरीब गरजू लोक रात्रीच्या वेळी थंडीत कुडकुडत असतात. अशा लोकांचा थंडीच्या तडाख्यामुळे बळी जातो. कडाक्याच्या थंडीने कोणाचेही प्राण जाऊ नये किंवा याचे प्रमाण कमी व्हावे तसेच गरीब व गरजूंना मायेची उब मिळावी याकरिता मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी हि हा उपक्रम राबविण्यात आल्याचे अंबादास खैरे यांनी सांगितले. या उपक्रमामुळे गरजूंच्या चेहर्‍यावर आनंद पहावयास मिळत आहे.