नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पर्यटकांची मांदियाळी
निफाड, दि. 29, डिसेंबर - गुलाबी थंडीचा चाहूल आणि नाताळच्या सुट्ट्यांचा उपयोग करून निसर्ग आणि पक्षीप्रेमी पर्यटक सध्या नांदूरमध्यमेश्वरच्या अभयारण्यात अर्थात प क्षितीर्थावर पक्षीनिरीक्षणाची मजा लुटत आहे. देशी आणि स्थलांतरित पक्षांचे नांदूरच्या पाण्यात सुरू असलेला नयनरम्य विहार पाहताना पर्यटकांचा आनंद ओसंडून वाहत आहे. विशेष म्हणजे आजपर्यंतच्या पर्यटकांच्या यंदाची गर्दी ही जास्त असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.
जागतिक पाणथळ क्षेत्र म्हणून नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य घोषित झालेले आहे. दरवर्षी नोव्हेंबर ,डिसेंबर, जानेवारी या महिन्यात येथे पक्षीप्रेमी पर्यटक देश विदेशातील पक्षांचा कि लबिलाट आणि त्यांचे मनोहारी आकाश आणि पाण्यातील विहार पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी दाखल होतात. या पक्षांत प्रामुख्याने पेंटेड स्टार्क प्लेमिंगो, काँब डक, कामन टेल, विजन, गढवाल स्पॉट, बिल, ब्राम्हणिडक स्पुनबिल, डोमेसिल क्रेन, गरगनी ब्लॉक, हेडेडगल, बारहेडेड, गुज, कॉमन पोचार्ड, आदींसह इतरही पक्षी येतात यातील काही पक्षितर आता इथेच स्थायिक झाले असुन ते वर्षभर दिसतात दर्शनासाठी पर्यटक भेटी देत आहे.

Post Comment