शिक्षकाचे घर फोडून सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास
सांगली, दि. 29, डिसेंबर - मिरज तालुक्यातील माळवाडी येथील एका प्राथमिक शिक्षकाचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 28 हजार 445 रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
माळवाडी येथील सुरेश अण्णा भानुसे (रा. जैन बस्तीनजीक) हे चार दिवसापूर्वी सुट्टीनिमित्त परगावी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून त्यांच्या घरात चोरी केली. भानुसे कुटुंबीय परगावाहून परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश करून सोन्या-चांदीच्या दा गिन्यांसह रोख रक्कम असा एकूण दोन लाख 28 हजार 445 रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सुरेश भानुसे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल के ली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक रविंद्र डोंगरे करीत आहेत.

Post Comment