रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
बल्लारपूर-गोंदिया या रेल्वे गाडीखाली उडी घेऊन येथील एका इसमाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास रामपूर तुकूम परिसरातील चिंचोली गावानजीक घडली. आनंदराव गंगाधर लाकडे (५९, रा. मूल) असे मृतकाचे नाव आहे.
येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये वास्तव्यास असलेले आनंदराव लाकडे हे गुरुवारी कामानिमित्त घरून निघाले होते. मात्र, सायंकाळ होऊनही ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. परंतु, त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. दरम्यान, शुक्रवारी आनंदराव यांचा मुलगा दिनेश याला त्याच्या वडिलाचा मृतदेह रेल्वे रुळावर असल्याची माहिती मिळाली.