पारदर्शक कारभाराच्या पिंडावर साबां मंञ्यांचे बेदरकार तिळार्पण बेमुवर्तखोरपणे पञकारांना भ्रष्ट ठरविण्याची मुजोरी.
मुंबई (विशेष प्रतिनिधी), दि. 13, नोव्हेंबर - महाराष्ट्र जळत असतांना पञकारांना मनेज करा असा शहाजोगपणा शिकवणारे सार्वजनिक बांधकाम मंञी चंद्रकांत दादा पाटील यांनी पंधरा डिसेंबरच्या आधी सरकारची पारदर्शकता गाडण्यासाठी आणखी एक खड्डा खोदला आहे.फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान जनतेला उद्देशून भाजी भाकरी मिळत नसेल तर शिरा पुरी खा असा उपहासी सल्ला देणार्या राज्यकर्त्यांपेक्षाही बेदरकार,मुजोरपणा साबां मंञ्यांमध्ये अधिक ठासून भरला असल्याच्या अनेक उदाहरणापैकी हे एक उदाहरण मानले जात आहे.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार पाहणारा मंञी बेदरकार,बेमुवर्तखोर,आणि तितकाच मुजोर असतो.कळत नकळत ही गुणवैशिष्ट्ये निर्लज्जपणाचीही पेरणी करतात.अ लिकडच्या पंधरा वीस वर्षात ज्या दिशेने सार्वजनिक बांधकाम मंञालयाचा कारभार सुरू आहे,त्यावरून हाच निष्कर्ष काढला जातोय.
रस्त्यांवर पडलेले खड्डे पंधरा डिसेंबरपुर्वी बुजवायचे आहेत.त्यासाठी नव्याने साबांत दाखल झालेल्या यंञणेला दुप्पट डांबर लागणार,त्यावरून अंदाजपञकातील तरतूदीपेक्षा दुप्पटचा निधी खर्च होणार.तो दाखवायचा कसा ? या अभियंत्यांच्या चितेंवर साबां मंञ्यांनी पञकारांना मनेज करण्याचा माञा सुचविणे म्हणजे मंञ्यांच्या विद्वत्तेचा नमूना मानला जात आहे.
लोकप्रतिनिधींशी संबंधित निवास इमारतीच्या कामात कोट्यावधींचा अपहार केल्याचा आरोप चौकशीत सिध्द होऊनही साबां मंञी चंद्रकांत दादा पाटील त्या महिला कार्यकारी अ भियंत्यांवर कारवाई करण्यास नकार देतात यातून आणखी कुठला वेगळा अर्थ काढणार?थोडक्यात विद्यमान साबां मंञी सरकारच्या ध्येय धोरणांच्या पिंडावर बेदरकारपणे तिळ वाहून बेमुवर्तखोरपणे पञकारांनाही भ्रष्ट ठरविण्याची मुजोरी दाखवित आहेत.

सत्तांतर होण्याआधी साबांचा कारभार पाहणारे छगन भुजबळ यांच्या संदर्भात अशा प्रतिक्रीया उमटत होत्या,त्याच मार्गावर विद्यमान साबां मंञ्यांचा कारभार सुरू असल्याने भ विष्यातील संकटाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.छगन भूजबळ यांना त्यांच्या कार्यशैलीबद्दल दुषणं दिली जात असली तरी आजी माजी साबां मंञ्यांच्या कार्यशैलीवर प्रभाव असणार्या घटकांमध्ये मुलभूत फरक सांगीतला जातो.
छगन भुजबळ हे विचारी,संयमी पण प्रसंगानुरूप आक्रमक होणारे नेते म्हणून परिचीत आहेत.आज त्यांच्यावर ठेवलेले आरोप त्यांच्या कार्यशैलीचा परिपाक असला तरी ती शैली त्यांची स्वतःची नव्हती.भुजबळ यांच्या भोवती गोळा झालेल्या चांडाळ चौकडीच्या फालतू हस्तक्षेपामुळे त्यांची कार्यशैली भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरली.जीभेवर असलेले नियंञण,स्पष्टवक्तेपणा,दोषी अभियंत्यांवर कारवाई ही त्यांची जमेची बाजू होती.चौकशीत दोषी आढळलेल्या अभियंत्यावर कारवाई क रण्यात त्यांनी हस्तक्षेप केल्याचे आठवत नाही.उलट त्यांच्या कार्यकाळात भ्रष्ट अभियंत्यांचे निलंबण झाल्याची उदाहरणे आहेत.
विद्यमान साबां मंञी चंद्रकांत दादा पाटील ना आक्रमक आहेत ना संयमी.कुठे काय बोलायला हवं याचे भान नसलेला नेता या पंक्तीत पक्के स्थान निर्माण केलेला नेता अशी त्यांची निर्भत्सना होते आहे.देवेंद्र फडणवीस सरकार पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांच्या सरकारचे साबां मंञी भ्रष्टाचाराला उघडपणे समर्थन देत आहेत.भ्रष्टाचार,गैरव्यवहार सिध्द झालेल्या अभियंत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात आहेत.इतकेच नाही तर बेदरकार,बेमुवर्तखोरपणे पञकारांना मनेज करा,चांगल्या बातम्या छापून आणा असा सल्ला अभियंत्यांना देत आहेत.
रस्त्यांवर पडलेले खड्डे पंधरा डिसेंबरपुर्वी बुजवायचे आहेत.त्यासाठी नव्याने साबांत दाखल झालेल्या यंञणेला दुप्पट डांबर लागणार,त्यावरून अंदाजपञकातील तरतूदीपेक्षा दुप्पटचा निधी खर्च होणार.तो दाखवायचा कसा ? या अभियंत्यांच्या चितेंवर साबां मंञ्यांनी पञकारांना मनेज करण्याचा माञा सुचविणे म्हणजे मंञ्यांच्या विद्वत्तेचा नमूना मानला जात आहे.
साबांने ही नवी यंञणा स्वीकारली तेंव्हा ही बाब स्पष्ट असणार.खड्डे बुजवितांना यंञ दुप्पट डांबर घेणार सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट असणार तर अभियंत्यांना अथवा त्यांच्या मुखियाला चिंता भेडसावण्याची गरज नव्हती.आग लागली तर धुर निघतो,धुराच्या दिशेने पञकार किंवा तपास यंञणा धाव घेऊन सत्यापर्यंत पोहचत असतात.याचाच अर्थ दाळीत भेसळ आहे.
यंञांच्या नावाखाली डांबर खाण्याचा नवा फंडा अभियंत्यांनी शोधून साबां मंञ्यांची मंजूरी घेण्याचा हा डाव आहे.दोषी यंञात नाही तर प्रवृत्तीत खोट आहे.विद्यमान साबां मंञ्यांचा कल भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे,दोषी अभियंत्यांना सुरक्षाकवच देणे याकडे आहे हे शहर इलाखा शाखेतील कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या गैरव्यवहारातील सहभागाला मंञ्यांनी दिलेले संरक्षण सिध्द करते.

Post Comment