शेतकर्‍यास लुटणार्‍याला पोलिसांनी केले चार तासात जेरबंद.

अहमदनगर/ प्रतिनिधी । 25 शेतातून घरी जाणार्‍या 23 वर्षीय शेतकर्‍यास एका अनोळखी इसमाने अडवून त्याच्या जवळील ऐवजाची मागणी केली. शेतकर्‍यांन नकार देताच त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन त्याच्याकडील तीन हजार दोनशे रुपये आणि दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून चोरुन नेला ही घटना शुक्रवारी दि.25 रोजी रात्री 8 च्या सुमारास दुसुंगेमळा ते कापूरवाडी या रोडवर घडली आहे. यानंतर सपोनी देशमाने यांनी तात्काळ रात्र गस्तीसाठी पोलिस रावाना केले. गस्तीसाठी जात असताना लपतछपत जातांना एकाला अटक केले. यानंतर याच्याकडून पोलिसांनी मोबाईल व रक्कम हस्तगत केली.


याबाबतची माहिती अशी की, कापूरवाडी येथील दुसुंगेमळा येथे राहणारा 23 वर्षीय शेतकरी युवराज सुभाष दुसुंगे हा शेतावरील काम आटोपून रात्री घराकडे येत असता कापूरवाडी ते दुसुंगेमळा रोडवर एका अनोळखी इसमाने त्याला अडवले आणि दमदाटी करत तुझ्या खिशातील मोबाईल आणि पैेसे मला दे असे म्हणाला यावर युवराज दुसुंगे याने पैसे व मोबाईल देण्यास नकार दिला. याचा राग येवून त्या अनोळखी चोरानी दुसुंगे याला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील तीन हजार दोनशे रुपये आणि दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने काढून घेतला व पसार झाले. 

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी युवराज दुसुंगे यांच्या फिर्यादीवरुन भादविक 392 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. याघटनेची तातडीने भिंगार कॅम्पने पावले उचलली आणि आरोपीला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्यांकडून 3200 रुपये व 2000 रुपयांचे कार्बन कंपनीचा मोबाईल असे मिळुन आले आहे. सदर आरोपी हा जबरी चोरी व चोरीचे गुन्ह्यात राहुरी पोलिस ठाणेत वॉटेड लिस्ट मध्ये असल्याचे समजते.