कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ
मुंबई, दि. 17, नोव्हेंबर - नोव्हेंबर राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकर्यांना वीज बिल भरण्यास आज शासनाने 15 दिवासांची मुदतवाढ दिली. आता 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकर्यांची वीज खंडित होणार नाही.
ज्या शेतकर्यांना अजूनपर्यंत वीजबिल वितरीत करण्यात आले नाही, त्या शेतकर्यांना महावितरणने त्वरीत वीजबिलाची वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 चा लाभ शेतकर्यांनी घेतला तर शेतकर्यांचे दंड व्याज बाजूला ठेवण्यात येईल. अनधिकृत वीजजोडण्या विरुध्द नियमानुसार कारवाई करावी. सदर योजनेतील इतर अटी व शर्तीं मध्ये अन्य कोणताही बदल नाही.
30 ऑक्टोबरलाच थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 ची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शेतकर्यांना 7 नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू वीजबिल 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकर्यांना आता भरता येईल.
30 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकर्यांने वीज कनेक्शन खंडीत केले जाणार नाही. 30 हजार रूपयापर्यंत मूळ रक्कमेचे पाच हप्ते करण्यात आले असून मुद्दल मूळ रक्कमेचे पाच हप्ते डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत शेतकर्यांनी भरायचे आहे.

Post Comment