ई-लर्नींग मध्ये चिखली मतदार संघाची गरूडझेपः आ.बोंद्रे
चिखली (प्रतिनिधी), 09 - विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद आणी नगर परिषद शाळेमध्ये ई-लर्नींग चे प्रोजेक्टर च्या आधारे अभ्यास सुरू करण्याचे काम जोमात सुरू असून संपुर्ण मतदार संघात आमदार निधितून व लोकसहभागातून ई-लर्नींग सुविधा उपलब्ध देण्यात येत असून स्पर्धेच्या युगात स्पर्धा करण्यासाठी विद्यार्थी सज्ज होत आहेत ही ई-लर्नीग मध्ये चिखली विधानसभा मतदार संघाची गरूडझेप होय असे मत आमदार राहुल बोंद्रे यांनी रूईखेड मायंबा येथे जि.प. शाळेतील ई-लर्नींग प्रोजेक्टर व सक्ेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत नंदुभाउ शिंदे, प.स.सदस्य रामराव जाधव, शमीम सौदागर, सोहेब सौदागर, अनिल फेफाळे, बाबुराव फेफाळे, शाळा समिती अध्यक्ष डॉ. साहेबराव सोनुने, सरपंच राजु साखरे, केशव साखरे, सुरेश टाकेकर, गणेश साबळे, सुधाकर फेफाळे, गजानन जाधव हे होते. यावेळी पुढे बोलतांना आमदार राहुल बोंद्रे यांनी म्हणाले की, स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षणाचे महत्व ओळखून ई-लर्नींगच्या प्रोजेक्टरची संकल्पना राबविण्यात येत असून सदर प्रोजेक्टरच्या माध्यमातून केवळ विद्यार्थी हेच अध्यापनाचे धडे घेत नसून तर शिक्षकांनी देखील याचा चांगला फायदा होतो असे सांगितले. सदर जि.प. शाळेमध्ये 4 प्रोजेक्टर बसविण्यात आले असून त्यातील 2 प्रोजेक्टर हे राहुल बोंद्रे यांनी आमदार निधीतून उपलब्ध करून दिले. तर 2 प्रोजेक्टर गावकरी, शिक्षकापासून तर सामान्य मजुरी करणार्या लोकांनी दिलेल्या लोकवर्गणीतून घेण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक मुख्याध्यपक गणेश इंगळे यांनी तर संचलन जि.एस.बेडवाल यांनी केले. यावेळी शिक्षक तसेच असंख्य गावकरी उपस्थित होते.