Breaking News

पत्रकार पेन्शन योजनेसाठी 15 कोटींची तरतूद


राज्यातील पत्रकारांना दिलासा देणारी बातमी आहे. पत्रकारांना स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी काही दिवसांआधी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेत पेन्शनचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात ठेवण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये पत्रकार सन्मान पेन्शन योजनेसाठी 15 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासनाने 2005 साली पेंशन योजना बंद केली आहे. पत्रकार खाजगी कर्मचारी असल्याचे कारण पुढे करत या योजनेची फाईल वित्त विकाही महिन्यांआधी सामान्य प्रशासन विभागाकडे परत पाठविली होती. गेल्या 29 जून रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात एक बैठक घेतली. माहिती जनसंपर्क विभागाचे अधिकारी, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समिती व वित्त विभागाचे प्रमुख उपस्थित होते. त्याच बैठकीदरम्यान मुनगंटीवार यांनी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मदान यांना फोन केला. पत्रकार सन्मान योजनेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये (पावसाळी अधिवेशनात) 15 कोटी रूपयांची तरतूद करावी असे आदेशच त्यांनी दिले. त्यादृष्टीने माहिती व जनसंपर्क विभागाने दुस-यांच दिवशी वित्त विभागास प्रस्ताव पाठविला. दरम्यान मुनगंटीवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन 15 कोटी रूपयांची तरतूद करण्यावर राज्य मान्यतेची मोहर उमटली. त्यामुळे पावसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये पत्रकार सन्मान योजनेसाठी 15 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतुन सन्मान योजना लवकरच सुरू होणार आहे. या निमित्ताने राज्यातील पत्रकारांची, पत्रकार संघटनांची दीर्घ काळापासन प्रलंबित असलेली मागणी मान्य झाली आहे.