आयपीएल सट्टेबाजी : दिल्लीत ४ जणांना अटक.


नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील गोकुलपुरी परिसरात आयपीएलवर सट्टा लावण्याचे रॅकेट दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून याप्रकरणी चार संशयितांना अटक केली आहे. गोकुलपुरीतील चांद बाग परिसरात काही जण आयपीएल सट्टेबाजीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. 

शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना सुरू असताना पोलिसांनी चांद बाग परिसरातील एका घरावर छापा टाकला. त्या वेळी राजेश शर्मा, आझाद, आरिफ ऊर्फ सोनी आणि मोहम्मद सलमान हे सट्टा घेताना रंगेहाथ सापडले. त्यांच्याकडून ८ मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि सट्टेबाजीच्या नोंदी असलेल्या दोन वह्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. .