गळफास घेवून वृद्धाची आत्महत्या

खरातवाडी, पिंपळगाव पिसा येथील नागरिक बापू रंगनाथ भापकर (वय 60 वर्षे) यांनी आपल्या राहत्या घराच्या समोरील चंदनाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भापकर यांनी पहाटे 5 ते 5. 30 वा. च्या सुमारास या त्यांच्या राहत्या घरासमोरील झाडाला कंबरेचे तीन ते चार करगोटे एकत्र करून स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतला असल्याची फिर्याद त्यांचे भाऊ अर्जुन रंगनाथ भापकर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे. बेलवंडी पोलीस ठाण्यात घटना घडल्या सीआरपीसी 174 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास आर.जे साबळे करीत आहेत.