डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मिरवणुकीसह भिमगितांचा कार्यक्रम
कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व भिमगितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले असुन, उद्या भिमगितांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती दत्तु गजरमल यांनी दिली.
समाजमंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सायंकाळी 4 वा. मिरवणूक निघणार आहे. समाजमंदिर, बसस्थानक, डॉ. तोरडमल हॉस्पिटलमार्गे मिरवणूक सिध्दार्थनगर येथे आणण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष नामदेव राऊत, आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भैलुमे, भिमराव साळवे, अंकुश भैलुमे, रोहन कदम तसेच गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.तसेच उद्या रविवारी रात्री 8 वाजता सिध्दार्थनगर येथे भिमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. बीड येथील बळीराम उफाडे टीमकडून हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

Post Comment