मंदीराचे खोदकाम करतांना आढळला मानवी सांगाडा!
चांदेगाव येथे चंद्रेश्वराचे जुने मंदिर आहे. मंदिरामध्ये पाणी पाझरत असल्याने मंदिरजवळ भिंत तसेच स्लॅप बांधायचे ठरले. खोदकाम सुरु असताना अचानक एक मातीचे मडके व त्याखाली हाडाची कवटी व इतर अवशेष आढळून आले. आजूबाजूला माती उरकून पाहिली असता इतरही हाडे आढळून आली. हे सर्व हाडे मानवाचेच असल्याचे स्पष्ट दिसत आहेत. नेमका हा मानवी सांगाडा कोणाचा, तो येथे कधीपासून आहे, हा सांगाडा मंदिर परिसरात कसा आला, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होते आहेत.
Post Comment