कटुवा अत्याचाराच्या निषेधार्थ भेंड्यात मूकमोर्चा


भेंडा प्रतिनिधी - जम्मू काश्मिरमधील कटुवा येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ भेंडा येथे मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी बंद पाळण्यात आला. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील व्यापारी संघटना, जमात - उल - उलेमा, मुस्लिम समाज व सर्वधर्मीय समाजाच्यावतीने सकाळी मुख्य बाजार पेठेतून काळे झेंडे व निषेधाचे फलक हाती घेऊन मूक मार्चा काढण्यात आला. त्यानंतर बसस्थानक चौकात निषेध सभा झाली. अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक करून त्यांना भरचौकात फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जि. प. च्या नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय काळे यांनी केली. कामगार तलाठी विजय जाधव यांना शाफीन शेख, अलफ्फिया शेख, आलिया शेख, रेश्मा सय्यद, उसामा पठान, आफान शेख, रेहान सय्यद या बालकांच्या हस्ते स्थानिक प्रशासनास निवेदन देण्यात आले.

यावेळी सर्व धर्मियांनी एकत्र येऊन कटुवा, कोपर्डी, उत्तर प्रदेशातील उन्नाव व गुजरामधील सुरत येथील अत्याचारामध्ये मृत्यूमुखी अल्पवयीन मुलींना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मौलाना आब्दुल आजिम,जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, अशोक मिसाळ, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश गव्हाणे, मुस्लिम समाजाचे नेते कादरभाई सय्यद, पत्रकार दिलदार शेख, सौंदाळयाचे माजी सरपंच शरद आरगडे, सोपान महापूर, उपसरपंच भाऊसाहेब फुलारी, प्रहार संघटनेचे अभिजीत पोटे, ढोकणे, कारभारी गरड, प्रतीक निकम, अँड. रविंद्र गव्हाणे, गोरक्षनाथ कापसे, आसिफ पठाण यांनी मनोगत व्यक्त करून निषेध व्यक्त केला. बाजार समिती संचालक डॉ. शिवाजी शिंदे, अशोक वायकर, व्यापारी संघटनेचे प्रमुख आबासाहेब काळे, देवेंद्र काळे, रामचंद्र गंगावने, संतोष मिसाळ, अफजल पटेल, अमिन सय्यद, समद शेख, अतिक शेख, अकबर शेख, महिताब सय्यद, समिर पठान, ख्वाजा सय्यद, रफिक सय्यद, महिताब सय्यद, छगन सय्यद, नागेश्वर तरूण मंडळाचे अध्यक्ष अशोक साळवे, भरत भालेराव, वसिम पठान, परवेज शेख, सलमान सय्यद, समीर सय्यद, मुन्ना शेख, सुजीत गोर्डे, अमर पठान, आसिफ पठान, अकिल कुरैशी, अन्सार सय्यद, तोफिक सय्यद, रज्जाक सय्यद आदींसह स्थानिक नागरिक या मूक मोर्चात सहभागी झाले होते.